प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- पन्हाळा तालुक्यातील माले येथे पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय आनंदा पाटील (वय 37.रा.माले ता.पन्हाळा) याला जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.एस.आर .साळोखे यांनी जन्मठेपेची शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकारी पक्षातर्फे Ad.मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी की,माले येथील दत्तात्रय आनंदा पाटील याने पत्नी शुभांगीचा हिच्याशी किरकोळ वाद वरचेवर होत होता या वादातुन 24 सप्टेंबर 20 रोजी पुन्हा वाद होऊन दत्तात्रय याने झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात प्रहार करून खून केला.या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली होती.त्या नुसार कोडोली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोप दाखल करून साक्षीदारांचा जबाब व असलेला पुरावा आणि सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.एस.ए.साळोखे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि 5000 र.दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सुरज बनसोडे (कोडोली पोलिस ठाणे) यांनी केला असून त्यांना पोलिस उपनिरीक्षक श्री.एस.ए.कोळी आणि पो.कॉ.रोहिणी खोत यांनी मदत केली.