प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कागल तालुक्यातील वंदुर येथे दारुच्या नशेत जन्मदात्या आईचा निलेश अशोक वाईंगडे (वय 30) याने सुनिता अशोक वाईंगडे (वय 50).यांचा विळ्याने वार करून खून केला.या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की,निलेश आणि त्याची आई सुनिता हे दोघेच रहात होते.त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे.त्यांची स्वतःची जमीन असून ही तो दुसरीकडे जाऊन ऊसतोड मजुराचे काम करीत होता.त्याला दारुचे व्यसन होते.वंदुर येथे काल झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या आंदोलनात तो सामील होता त्यावेळी दारुच्या नशेत होता.बुधवारी रात्री आई झोपली होती.
निलेश रात्री तर्र होऊन दारुच्या नशेत घरी येऊन झोपेत असलेल्या आईचा विळ्याने वार करून खून केला.हा वार इतका वर्मी होता की घरात सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या.निलेश खून करून दारातच झोपून सकाळी चुलत भावाकडे जाऊन आई ऊठत नसल्याचे सांगितले.चुलत भावाने घरी येऊन परिस्थिती पाहून या घटनेची माहिती कागल पोलिसांना दिली .कागल पोलिसांनी घटना स्थळी येऊन पहाणी करून संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.पुढ़ील तपास कागल पोलिस करीत आहेत.