बनावट देशी दारू तयार करीत असलेल्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक करून पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-करवीर तालुक्यातील खुर्द पाडळी येथे बनावट दारु तयार करीत असलेल्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक करून त्यांच्या कडील 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.परशराम केसरकर (वय 40.रा.नांगनूर ,कर्नाटक).आणि ओमप्रकाश शुक्ला (वय 52.रा.गांधीनगर ).अशी अटक केलेल्यांची नावे असून एक जण पसार आहे.


अधिक माहिती अशी की,राज्य उत्पादन विभागाला वरील गावात बनावट दारु तयार होत असल्याची माहिती मिळाली.त्या नुसार या विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी भरारी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले होते.या पथकाचे उपअधीक्षक राजाराम खोत यांनी आपल्या सहकारयांसह छापा टाकून दारु तयार करण्यासाठी लागणारयां सामुग्री बरोबर त्याच्याकडील कारसह असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post