स्वत:ही विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कागल येथील जयसिंगपार्कात रहात असलेल्या शंकर कलगोंडा पाटील (वय 82) याने आजारी असलेली पत्नी पार्वती शंकर पाटील (वय 78) हिला पाण्यातुन विष पाजून गळा दाबून खून करून स्वतःही विष प्राशन केले.या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शैलजा पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी की,जयसिंगपार्कात हे वयोवृध्द जोडपे आपल्या नातेवाईकांसोबत रहात आहे.शंकर पाटील यांची पत्नी पार्वती काही महिन्यापासून आजारी असल्याने बेडवरच झोपून असल्याने तिची सेवा शंकर पाटीलच करीत होते.त्यातच त्यांनाही शुगर आणि बीपीचा त्रास असल्याने तेही त्रासले होते.त्यामुळे पत्नीची सेवा करायला जमत नव्हते.त्यांनी आपल्या नातेवाईकांना पत्नीची सेवा करायला जमत नसल्याचे सांगितले.त्यांनी कंटाळून 22 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी शंकर पाटील यांनी पाण्यातुन विष पत्नी पार्वतीला देत तिचा गळा दाबून खून करून स्वतः ही विष प्राशन करून बेशुध्दावस्थेत पडले .
हा प्रकार घटनेच्या दुसरया दिवशी नातेवाईकांच्या निदर्शनास आला.दरम्यान शंकर पाटील यांनी ही विष घेतल्याने बेशुध्दावस्थेत होते.त्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी कोल्हापुरात एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.या प्रकरणी शंकर पाटील यांच्यावर पत्नीचा खून केल्या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.