प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुर शहरात आणि उपनगरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढ़ले आहे.वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून शहरातील पोलिस ठाण्याना तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हें शोध पथक राजारामपुरी परिसरात गस्त घालत असताना त्यांना विना नंबरप्लेटची दुचाकी घेऊन जाताना दिसले .त्या दोघांच्याकडे चौकशी करत असताना प्रथम त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ही मोटर सायकल चोरीची असल्याचे सांगितले.त्यांनी शाहुपुरी आणि जुना राजवाडा परिसरातुन पाच मोटारसायकली चोरल्याचे सांगितले असता सव्वा लाख किंमतीच्या त्याच्या ताब्यातील पाच दुचाकी जप्त करून चोरटा अमन जावेद पठाण (वय 19.रा.शिंगणापूर )याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.या दोघांनी गेल्या काही महिन्या पासून वरील परिसरात चोरी केल्याचे सांगितले.
ही कारवाई राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव,पो.ह.समीर शेख ,विश्वास खराडे,महिला पो.सुप्रिया कचरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी केली.