प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारयास अटक करून त्याच्याकडील एक लाख तीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई करवीर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने केली.आशिष अनिल चिले (वय 27.रा.पाचगाव) असे आरोपीचे नाव आहे.
आर.के.नगर येथून श्रीमती आशालता सुरेश माजगावकर या 10/11/23 रोजी सकाळी पायी चालत जात असताना पाठीमागून येणारयां दुचाकी स्वाराने गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारुन नेली होती.याबाबतची तक्रार करवीर पोलिसांत दिली होती.या अनुशंगाने तपास करीत असताना गिरगाव रोड वर चोरीतील दागिने विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळालया वरून त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक करून एक लाख तीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.अरविंद काळे,गुन्हे शोध पथकातील पो.अंमलदार विजय तळसकर यांच्यासह त्यांच्या सहकारयांनी केली.