ई वॉर्डासाठी शनिवारपासून थेट पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शनचे काम



प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले : 

कोल्हापूर ता.30 : काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे फुलेवाडी येथे शनिवार दिनांक 02 डिसेंबर 2023 रोजी हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणारा संपूर्ण भाग, कसबा बावडा उंच टाकी, ताराबाईपार्क उंच टाकी, टेंबलाई टाकीवरील संपूर्ण भाग आणि कावळानाका उंच टाकीवरील अंशत: भागातील नागरीकांना शनिवार दिनांक 02 व रविवार दिनांक 03 डिसेंबर 2023 अखेर दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच सोमवार दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होईल.

            तरी कसबा बावडा उंच टाकीवरील संपूर्ण बावडा परिसर, संपूर्ण लाईन बजार परिसर, संपूर्ण कदमवाडी-जाधववाडी परिसर, न्यु पॅलेस परिसर, रमणमाळा परिसर, ताराबाईपार्क उंच टाकीवरील सदर बजार परिसर, कनाननगर परिसर, ताराबाई पार्क परिसर, नागाळपार्क परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, टेंबलाई टाकीवरील विक्रमनगर परिसर, उंचगाव परिसर, टेंबलाई टाकी परिसर, टाकाळा परिसर, व कावळानाका उंच टाकीवरील साईक्स एक्सेक्टेन्शन, शाहुपूरी परिसर, रेल्वे स्टेशन रोड परिसर, न्यु शाहुपूरी परिसर, शिवाजीपार्क परिसर, रूईकर कॉलनी परिसर, मार्केटयार्ड परिसर बापट कॅम्प परिसर या भागातील नागीकांना दैनंदिन पिण्याचे पाणी पुरवठा होणेचे दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. तरी या भागातील नळ कनेक्शनधारकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post