प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : आज देशाची अस्मिता असणारे संविधान बदलण्याचा मोठा प्रयत्न भाजपा आणि आरएसएसच्या माध्यमातून सुरू आहे. संविधान वाचवण्याची मोठी जबाबदारी आपली असून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू राहील. वंचित समाजावर मनुस्मृतीच्या माध्यमातून गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. संविधानाच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जनतेने यावे, असे आवाहन वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी केले.
शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुरुंदवाड येथे संविधान जनजागृती सभा आणि संविधान दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास कांबळे होते.
यावेळी प्रमोद कदम, इस्माईल समडोळे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वासंतीताई म्हेतर, रावसाहेब निर्मळे यांनी मनोगत व्यक्त करून संविधान जनजागृती यासंदर्भात मार्गदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनीही आपल्या भावना मांडल्या. प्रा. विलास कांबळे म्हणाले, येथील राज्यकर्त्यांकडून व काही सनातनी विचारसरणीच्या धर्मांध शक्तीकडून संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्याच्या पासून आपल्याला संविधान वाचवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रबोधनाची मोहीम हाती घ्यावी असे आवाहन कांबळे यांनी केले.
यावेळी महादेव कुंभार, पुंडलिक कांबळे, गरीब सेनेचे संस्थापक सतीश भंडारे, जयेश कांबळे, रवींद्र कांबळे, संजय सुतार, प्रकाश टोनप्पे, शितल माने, विकास बाचने, विश्वास फरांडे, तमन्ना कदम, भीमराव गोंधळी, रवी पोवार, महेंद्र कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. वंचितमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा तसेच सर्व मान्यवर व यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. सांगली येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सत्ता संपादन सभेसाठी शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली. नवे दानवाड व परिसरातील भीम अनुयायांनी शाहिरी व गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका महासचिव रमेश कांबळे, उपाध्यक्ष उदय कांबळे, उपाध्यक्ष मोहन माळगे, कुरुंदवाड शहर उपाध्यक्ष अमोल मधाळे यांनी केले.