पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सदस्यांना पद नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव" व सिद्धरेखा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार समन्वय समिती , यां संस्थांच्या विद्यमाने कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगांव मध्ये दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती वर्धापन दिनानिमित्त 26/11 मुंबई बॉम्बस्फोट मधील शहीद जवान, पोलीस अधिकारी व नागरिक यांना मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करणे व पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सदस्यांना पद नियुक्ती पत्र प्रदान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांमध्ये मा.श्री राकेश खोंद्रे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कोल्हापूर, जिल्हा युवा शिवसेना अध्यक्ष), मा. श्री सखाराम जाधव (ग्रामदेवता व दैनिक परतगंगाचे संपादक), संजय कदम (सामाजिक कार्यकर्ते), अशोक भाजपा कार्यकर्ते) शोभा वसवाडे( भाजपा चिटणीस) विशाल पाटील, निगार मुजावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ.निर्मळे /चौगुले श्वेता सचिन या होत्या. सूत्रसंचालन प्राध्यापिका शिरतोडे/ चव्हाण वनिता यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका सावंत ए. पी. यांनी मांडले.
कार्यक्रमात इतर उपस्थितीमध्ये प्रा. सोरटे एस. के. प्रा.सौ. पवार ए.आर.,चौगुले एस एस पाटील पी. व्ही.,चव्हाण आर.आर., शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड.प्रथम व द्वितीय विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, भारतमाता प्रतिमापूजन, शहिदांना श्रद्धांजली, मान्यवरांची मनोगते व अध्यक्षीय भाषण अशा स्वरूपात झाले. जिल्ह्यातील विविध पोलीस मित्रपरिवार समन्वय समितीच्या सदस्यांना पदनियुक्तीची प्रशस्तीपत्रे प्रधान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ.निर्मळे /चौगुले श्वेता सचिन या होत्या. त्यांनी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यामध्ये राकेश खोंद्रे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सखाराम जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री संभाजी भोसले यांची पश्चिम महाराष्ट्र सल्लागारपदी श्री संजय कदम यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विशाल पाटील कोल्हापूर जिल्हा सचिव पदी व श्री रणजीत चव्हाण यांचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी ,प्राध्यापक वनिता शिरतोडे प्राध्यापक शिक्षक आघाडी अध्यक्ष, निगार मुजावर आळते तालुकाध्यक्ष ,शोभा वसवाडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिला, अशोक पुरोहित इचलकरंजी शहराध्यक्ष ,गणेश चोळके इचलकरंजी शहर उपाध्यक्ष, अशाप्रकारे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ संघपाल उमरे सर व महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री सुनील परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभले.