प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर परिमंडळ : स्थानिक केबल ऑपरेटर्सद्वारे महावितरणच्या संरचनेवर /विद्युत यंत्रणेच्या जाळ्यात बेकायदेशीरपणे केबल्स बसविल्याचे निदर्शनास येते. यामुळे प्राणघातक आणि गैर-प्राणघातक अपघातांच्या धोका संभवतो. केबल ऑपरेटर्सची हे कृत्य बेकायदेशीर आहे. महावितरणच्या लाईन्स/उपकरणे आणि या लाइन्स/उपकरणांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या /तंत्रज्ञाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. तसेच ग्राहकांच्या विद्युत पुरवठ्यात अडथळा करणारे असून महावितरणचे आर्थिक नुकसान करणारे आहे. तरी स्थानिक केबल ऑपरेटर्सनी तत्काळ अशा केबल्स काढून घ्याव्यात, असे महावितरणचे आवाहन आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने यापूर्वीच आपल्या आदेशाद्वारे केबल ऑपरेटरकडून महावितरणच्या खांबावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
महावितरण विद्युत यंत्रणेतील रोहित्र, उच्चदाब आणि लघुदाब वीज वाहिनी इत्यादींवर बेकायदेशीरपणे केबल्स लावण्यात येऊ नयेत. सद्यस्थितीत असलेल्या सर्व केबल्स तात्काळ काढण्यात याव्यात. महावितरणच्या संरचनेवरील बेकायदेशीर केबलमुळे मानव/प्राणी, प्राणघातक/गैर-प्राणघातक अपघात झाल्यास, महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास, स्थानिक पोलिस ठाण्यात सबंधित केबल मालक/एजन्सीविरुद्ध तक्रार नोंदवली जाईल आणि या एजन्सींकडून नुकसान भरपाईचा दावा केला जाऊ शकतो. तसेच धोकादायक व काम करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या या केबल्स हटविण्याची कारवाई महावितरणकडून होऊ शकते.