प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुरात एक मुस्लिम युवक एका अल्पवयीन मुलीस घेऊन फिरणारया लव्ह जिहादच्या संशया वरुन तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी जमावाने बेदम मारहाण केली.या मारहाणीत जखमी झाला आहे.समीर सुलेमान बिजली (वय 22.रा.किणी).असे त्यांचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,समीर हा एका अल्पवयीन मुलीस रंकाळा परिसरात फिरण्यासाठी आला होता.सदरची मुलगी अल्पवयीन असल्याने तेथे असलेल्या नागरिकांने हिंदु एकताच्या कार्यकर्त्याना याची माहिती दिली.हिंदु एकताचे कार्यकर्ते येऊन त्या युवकाकडे चौकशी करत त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत तो जखमी झाला.
या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच घटना स्थळी जाऊन चौकशी करत समीर आणि त्या अल्पवयीन मुलीस तपासणी साठी सीपीआर रुग्णालयात पाठविले .त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक श्री.सतीश गुरव यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
.