दुचाकी स्वारांनी दुचाकी चालविताना रस्त्याच्या मधून चालवून अपघात झाल्यास विमा मिळणार नाही.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- काही विमा कंपन्यां कडुन मोटारसायकल चालकांना हायवे वरुन टु व्हीलर चालवितांना   रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पांढ़रयां पट्ट्यापासून तीन फूट असलेल्या मार्गावरुनच चालव्यात अशा सूचना काही विमा कंपन्यांनी केले आहे.हा मार्ग सोडुन फोर व्हीलरच्या मार्गावरुन मोटरसायकल चालविताना अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारचा विमा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

तरी प्रत्येक मोटारसायकलस्वारांनी आपली आणि आपल्या कुंटुबाची काळजी घेणे आवश्यक आहे.काही दुचाकी स्वार बेधक वाहन चालवून अपघातात वाढ़ होत असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे अपघातात वाढ़ होत आहे.या सर्वाचा परिणाम विमा कंपन्यांवर पडल्यामुळे काही विमा कंपन्यांनी नियमावलीत बदल केले आहेत.जर एखाद्या दुचाकी स्वाराचा अपघात झाल्यास त्यावेळी त्या गाडीचा इन्शुरन्स ,तसेच ज्या वेळी अपघात झाला त्या काळातील वाहनाचे हवा प्रदुषण प्रमाण पत्र आवश्यक असणे गरजेचे असते ही कागदपत्रे असतील तरच विमा मिळतो.म्हणुन प्रत्येक दुचाकी स्वारांने काळजी पूर्वक वाहतुकीच्या नियमानुसार वाहने चालवावित.

Post a Comment

Previous Post Next Post