प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-शहरात आणि उपनगरात गंभीर स्वरुपाचे गुन्हें पोलिसांत दाखल असलेल्या केदार घुरके याच्यासह त्याच्या साथीदारांवर विशेष मोका कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक यांनी परवानगी दिली आहे.
मोका कायदाअंतर्गत केदार घुरकेसह त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.जुना राजवाडा पोलिसांनी या टोळी विरुध्द पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता.पोलिस अधीक्षकांनी पुढ़ील कारवाई साच्या विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुल्लारी यांच्याकडे सादर केला होता.त्या नुसार परवानगी दिली.या कामी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके ,पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव ,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे महादेव वाघमोडे यांनी पाठपुरावा केला होता.