गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जा देण्याचा शासनाचा निर्णय ; आयटक कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश



प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे राज्य सचिव कॉ शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली ठीक सकाळी अकरा वाजता मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आठवा मजल्यावरील कार्यालयात ठिया आंदोलनास सुरुवात झाली या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 400 गरप्रर्वतक महिला सहभागी होत्या.

त्यानंतर तातडीने संघटनेच्या प्रतिनिधींना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहाय्यक संचालक श्री सुभाष बोरकर यांनी कॉ शंकर पुजारी यांच्यासह  बोलवून घेऊन चर्चा केली.

त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की गटप्रवर्तक महिलांना ज्या ऑर्डर्स दिल्या जातात त्या ऑर्डर्स मध्ये व इतर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स मध्ये एक शब्दाचाही फरक नाही सेवा शर्ती मध्ये काही फरक नाही परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ गटप्रवर्तक महिलांना डावलले जात आहेत. त्यासाठी लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही असे सांगण्यात आले.ठिय्या आंदोलनाची सुरुवात  झालेलीच होती.

दुपारी दोन वाजता विधानसभा  उपसभापती श्री नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटना प्रतिनिधी व आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग सुरू झाली. या मीटिंगवर राष्ट्रीय आरोग्य अभियाना मधील 400 महिलांनी केलेल्या गटप्रवर्तक महिलांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव होता. त्यामुळे खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.

 एक महिन्यात  महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कामगारांचे लाभ देण्याचा रिपोर्ट तयार करून तो भारत सरकारकडे सादर करण्यात येईल. दोन हजार रुपये भाऊबीजेचे रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येईल. गटप्रवर्तक महिलांना करण्यात आलेले मानधन अपुरे असल्यामुळे ते मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला

 संपाच्या काळातील दिवस भरून काढल्यास संपाच्या काळातील पगार सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना मिळणार आहे. दुपारी पाच वाजता ठिय्या आंदोलन समाप्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post