शेतकरी संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हें दाखल.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते.या संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर शिरोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतकरी यांच्या ऊसाला योग्य भाव मिळण्यासाठी पहिली ऊचल 3500/आणि मागील हंगामातील 100/ रु.मिळावी या मागणी साठी राष्ट्रीय महामार्ग आंदोलनकर्त्यांनी अडवून धरला होता.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला होता.त्यातच जिल्हा बंदीचा आदेश असल्याने पाच किंवा त्याहून अधिक लोक एकत्र येण्यास ,सभा घेण्यास आणि मिरवणुका काढ़ण्यास बंदी असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्या प्रकरणी ठाणे अंमलदार कांबळे यांनी या संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी,विक्रम पाटील,प्रा.जालंदर पाटील,शाहरुख पेंढ़ारी आणि राहुल पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्यावर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हें दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post