प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
मौजे वडगाव (तालुका हातकणंगले) येथील बालवधूत हायस्कूल मध्ये कार्यरत असणाऱ्या सौ. सरोजनी रामचंद्र कारंडे यांना"आनंदगंगा फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय नारीशक्ती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. फौडेशनच्या अध्यक्षा- सौ लेखा मिणचेकर, यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
॥ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ||
या उक्ती प्रमाणे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अप्रतिम अशी कामगिरी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आनंदगंगा फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय "नारीशक्ती आदर्श" हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे पार पडला. यावेळी बालअवधूत हायस्कूल वडगाव, संस्थेचे संस्थापक, चेअरमन सदाशिव चौगुले, सेक्रेटरी संजय चौगुले, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे मी हे संपादन करू शकलो असे मत सौ.सरोजिनी कारंडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. सागर मानेसर , फौंडेशनचे अध्यक्ष- तानाजी पवार व सौ. लेखा सुजित मिणचेकर, सौ. जान्हवी इंगळे, विनायक भोसले , सौ ऊर्मिला पाटील, श्री विराट गिरी, शामराव पाटील, आदी मान्यवर उपस्थितीत होते.