प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड ) पेठ वडगाव या महाविद्यालयांमध्ये दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली .
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून हातकणंगले तालुक्याच्या विषय तज्ञ व SEAS प्रशिक्षण कार्यशाळेच्या समन्वयक श्रीमती पूजा कांबळे या उपस्थित राहिल्या त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. आर . एल. निर्मळे उपस्थित होत्या .त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण चे समन्वयक श्री.एस.के. सोरटे ,समन्वयक व्ही.ए.कोळी , महाविद्यालयातील प्रा.शिरतोडे व्ही.एल. ,प्रा.अमृता सावंत. प्रा डॉ ए आर पवार ,प्रेरणा पाटील, ग्रंथपाल चौगुले आणि राज्य शैक्षणिक संपादणुक चाचणी सर्वेक्षणासाठी क्षेत्रिय अन्वेक्षक म्हणून विद्यार्थी उपस्थित होते.
03/11/2023 रोजी होणाऱ्या राज्य शैक्षणिक संपादणूक चाचणी SEAS प्रशिक्षणासाठी पूजा कांबळे समन्वयक हातकणंगले तालुका यांनी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑफलाइन ट्रेनिंग दिले अनेक मुलांच्या संख्येचे निरसन केलं आणि ही परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची याबद्दल विशेष असं मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण झाले आणि शाळा निवड , एफ आय फॉरमॅट , फिल्ड नोट कशा पद्धतीने पूर्ण करायचं याविषयी विशेष असं मार्गदर्शन त्यांनी केलं. या 03/11/2023 रोजी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.आर.एल.निर्मळे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या SEAS प्रशिक्षणाचे प्रस्ताविक एस.के.सोरटे यांनी केले तर आभार सावित्रीबाई फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालय पेठवडगाव येथील या SEAS चे समन्वयक व्ही.ए.कोळी यांनी केले.