अंबप येथे शालेय विद्यार्थिनींच्या समवेत ग्रीन क्लबच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव, यांच्या अंतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक दोन, शालेय आंतरवासिता गट क्रमांक दोन, अंबप गर्ल्स हायस्कूल अंबप येथे शालेय विद्यार्थिनींच्या समवेत ग्रीन क्लबच्या अंतर्गत उपक्रम राबवण्यात आले. 

हे उपक्रम राबवत असताना, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डाॅ. सौ.निर्मळे आर .एल .व मार्गदर्शिका प्राध्यापिका सौ. सावंत ए.पी. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव व्ही.एस. व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, छात्राध्यापिका उपस्थित होते. ग्रीन क्लब च्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये 

♦वृक्षारोपण, 

♦रांगोळी-

    1)पृथ्वी वाचवा 

    2)पाणी वाचवा

    3) झाडे लावा झाडे जगवा

    4) प्रदूषण थांबवा

    5) मुलगी: एक मुक्त पक्षी 

 ♦चित्रकला-

        1) निसर्ग चिञ

        2) परिसर स्वच्छता

        3) वृक्षारोपण 

        4)मी अनुभवलेला किल्ला, 

♦पथनाट्य- 

  1)जागर पर्यावरणाचा: तुमच्या              आमच्या सलोख्याचा

♦आरोग्य केंद्राला भेट ,

♦स्वच्छता मोहीम,

♦हात धुवा दिन ,

♦टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, 

♦पर्यावरण पूरक नवरात्री व्याख्यान,

♦नशा मुक्त भारत अभियान कार्यशाळा,

♦ निबंध स्पर्धा यासारखे विविध उपक्रम कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठवडगाव यांच्या अंतर्गत अंबप येथील शालेय आंतरवासितेमध्ये राबविण्यात आले.

 ग्रीन क्लब अंतर्गत हे सर्व कार्यक्रम राबविण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. निर्मळे आर.एल. व मार्गदर्शक सौ. सावंत ए.पी. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.सोरटे एस. के., प्रा.शिरतोडे व्ही. एल., प्रा. डॉ .सौ.पोवार ए.आर., पाटील पी. व्ही., ग्रंथपाल चौगुले एस. एस.यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post