प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातिल शिंदेवाडी येथील ओंकार विलास पाटील (वय 24) या तरुणाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडुन ठार झाला.शिंदेवाडी गावातुन ट्रॉली चालक ऊस तोड मजूर आणण्यासाठी जात असताना.ओंकार ट्रॉलीच्या मागे दुचाकी घेऊन ओव्हरटेक करून जात असताना समोरुन गाडी आल्याने तोल जाऊन ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाला.
करवीर पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.ओंकार हा गावातच मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जात होता.त्याला विवाहित बहिण असून वडील शेती करतात.ओंकार आई वडीलांना एकटाच होता.त्या दिवशी सुट्टी असल्याने बाहेरगावी जात असताना त्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढ़ील तपास करीत आहेत.