प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पुणे येथे शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार माधुरी पुंडलीक भारमल(ब.नं.1856) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे -पाटील हे गेल्या सहा दिवसा पासून उपोषणास बसून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे महाराष्ट्रासह सगळीकडे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकार घडत आहेत .
सदर आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांनी केलेली निदर्शने,निषेध दरम्यान उदभवलेली परिस्थीती योग्य रित्या हाताळुन आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या हस्ते महिला पोलिस अंमलदार माधुरी भारमल यांचा पुष्पगुच्छ आणि विशेष पुरस्कार प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.