प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : कागल औद्योगिक वसाहतीमधील इंडो काऊंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप शनिवारी मिटला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा करार यावेळी करण्यात आला.
पगारवाढीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये हा यशस्वी करार झाला.व कंपनीचा संप मिटवण्यात आला.
यावेळी राजाभाऊ सांडुगडे, सुजित घाटगे, गणेश घाटगे, महादेव माने, संतोष डांगे, कृष्णात चौगुले, सचिन शेणवी, कैलास खोत भारतीय दलित महासंघ जिल्हा अध्यक्ष कामगार संघटना आशा ताई गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते..