दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
सरनोबतवाडी (तालुका करवीर) येथील सकल मराठा समाज, गावातील तरुण मंडळ, महिला बचत गट, सेवा संस्था व स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन कोल्हापूर,व योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त पुढाकाराने आज दिनांक 01/11/2023 रोजी सरनोबतवाडी एन एच फोर हायवे फुलाजवळ सर्विस रोड वरती,मराठा आरक्षण मिळवण्यासाठी व श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, ह्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, अशा आशयाच्या घोषणांनी परिसर दनाणून सोडला. तसेच महाराष्ट्र सरकारला चेतावणी देण्यात आले की मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर मिळालं पाहिजे अन्यथा जो मराठ्यांचा आरक्षण लढा शांततेने चालू आहे त्याला वेगळे वळण लागेल. व त्याला फक्त आणि फक्त कारणीभूत हे सरकार असेल अशा कडक शब्दात सरकारला चेतावणी योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा,यांनी दिली.
ह्या वेळी माजी चेअरमन श्री खंडेराव माने, चेअरमन श्री अगंद गजबर, बबन तोरस्कर, बाबासाहेब एरंडोल, स्वाभिमान संघटना संस्थापक अध्यक्ष श्री युवराज माने, सेक्रेटरी श्री युवराज पाटील, रमेश कनेरकर, महादेव माने, विक्रम पाटील, किरण अडसूळ, सागर गजबर, योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा, समीर संनधी, बापू पाटोळे, राकेश भाई, बाजीराव जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय देवकर, उपाध्यक्ष पांडुरंग नकाते, व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते