प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आज रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने महानगरपालिका इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे,प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण अजयकुमार बिरनगे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार , सहा. लेखापरीक्षक दिलीप हराळे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे , क्रीडा अधिकारी संजय शेटे , सदाशिव जाधव, प्रदीप झंबरी, विजय पाटील, अविनाश रंगाटे, यांचेसह शाहू हायस्कूलचे शिक्षक पी.आर.पाटील, कुंभार सर आणि विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच महानगर पालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.