प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. १६ समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळी अंक २०२३ ही योजना सुरू करण्यात आली आहे .या योजनेमध्ये साहित्य रसिक वाचकांना अनेक उत्तमोत्तम अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या योजनेचा प्रारंभ अजितमामा जाधव, संभाजी शेळके, जगन्नाथ पोवार, अल्लाबक्ष मुजावर, अर्चना दातार, मल्लिकार्जुन तेग्गी,मोहम्मद शेडबाळे, रेखा सौंदत्तीकर, विठ्ठलदास जाजू ,अजित शेडबाळे आदींसह अनेकांनी सभासदत्व स्वीकारून केला. इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिक वाचकानी या योजनेचे सभासदत्व स्वीकारून लाभ घ्यावा.असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.