प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
अब्दुललाट येथे विद्योदय मुक्तांगण परिवारच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रेमाची फुंकर घालत ऊसतोड मजूर बांधवासोबत वंचितांची दिवाळी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्यासह अन्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऊसतोड बांधव दिवाळीच्या सणावेळी आपले घरदार सोडून पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोड मजुरीसाठी येतात. त्यामुळे ते दिवाळी सण साजरा करू शकत नाही.याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली पाच वर्षे विद्योदय मुक्तांगण परिवारच्या वतीने ऊसतोड बांधवांसाठी वंचिताची दिवाळ हा उपक्रम साजरा करण्यात येतो.ऊसतोड बांधवांना दिवाळीची भेट देऊन त्यांना आम्ही आपल्यासोबत आहोत ,हा विश्वास देण्यात येतो.आम्ही आपल्या मुलांसाठी ऊस गळीत हंगामाच्या काळामध्ये शाळेची व्यवस्था करत आहोत.त्यामुळे त्यांना शाळेला पाठवा ,त्यांची शाळा तोडू नका..पुढच्या वेळी आपल्या मुलांना तोडीसाठी घेवून येवू नका .तुमची मुले शिकली तर गरीबी ,दारिद्र्य अशा दृष्टचक्रातून बाहेर पडू शकतील ,हा विश्वास अनेक मान्यवरांनी यावेळी ऊसतोड मजुरांना दिला .
यावेळी दिवाळीचा फराळ , सुगंधी तेल,सुगंधी साबण हे जीवन उपयोगी साहित्य तसेच मेणबत्ती ,दिवा ,लहान मुलांचे कपडे , मुलींना नवीन ड्रेस देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ , निवेदक शशिकांत मुद्दापुरे ,गुरुकूल संस्थेचे चेअरमन गणेश नायकुडे , आधार फौंडेशन रुकडीचे अध्यक्ष संदीप बनकर ,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सांगावे , वर्षा पाटील , सामाजिक कार्यकर्ते कुरुंदवाडे काका, ब्रिज अकॅडमीचे संस्थापक संदिप राणे ,श्री.मराठे तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्शा माळी यांनी तर आभार वर्षा पाटील यांनी मानले.