प्रेस मीडिया लाईव्ह :
संतोष आठवले :
इचलकरंजी : भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादक माफियांना नियंत्रीत करण्यासाठी शासनाने विशेष मंत्रालयाची स्थापना करावी या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना च्या वतीने मंगळवार दिनांक 7/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजले पासुन प्रांताधिकारी कार्यालय इचलकरंजी येथे बेमुदत आमरण उपोषण
व्हे पावडर ,रिफाईन्ड पाल्म तेल , पाल्म करनेल तेल व ग्लिसरीन मोनो स्टिरट यांचा वापर करून भेसळयुक्त खवा चक्का व पनीर उत्पादक माफिया हे हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी औद्योगीक वसाहत , भादोले , नंरदे ,हालोंडी . इचलकरंजी व शिरोळ तालुक्यातील अकिवाट . मजरेवाडी .हेरवाड , सै . टाकळी खिद्रापूर अ .लाट ,आलास .गणेशवाडी कवठेगुंलद नृसिंहवाडी . यड्राव ,टाकवडेआदी गांवात भेसळयुक्त खवा .चकका व पनिर उत्पादन मोठ्या प्रमाणात करित असुन मुंबई ,पुणे , गोवा , हैदराबाद आदी मोठ्या शहरात व शेजारील इतर राज्यात वितरण केले जाते याकडे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रालयाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अश्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर कडक निर्बंध घालण्यात येऊन यांना नियंत्रीत करण्यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करावी या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 सकाळी 11.00 वाजले पासुन इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण आंदोलन करित आहोत
शिरोळ तालुक्यातील अकीवाट मजरेवाडी हेरवाड तेरवाड येथील माळभाग परिसरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा बनवण्याचा कारखाना आहे दिवसाला हजारो टन खव्याचे उत्पादन येथे होत असते एक किलो खवा बनवण्यासाठी पाच लिटर दुधाची आवश्यकता असते येथील एका आस्थापणे मध्ये दररोज 3000 टन खवा उत्पादन केले जाते या करिता सुमारे 15000 लिटर दुधाची गरज असते या परिसरातून हजारो लिटरची उत्पादन क्षमता नाही मग एवढ्या मोठ्या पद्धतीने खावाची उत्पादन होते कसे हा यक्ष प्रश्न आहे ? खवा उत्पादक आस्थापनामध्ये कृत्रिम दुधाची निर्मिती केली जाते एक लिटर दूध व एक लिटर पामतेल आणी निकृष्ढ दर्जा चे दूध व्हे पावडर या पासुन 13 लिटर कृत्रिम दुधाची निर्मिती केली जाते तसेच नॉट फॉर सेल असलेली कर्नाटक राज्यातील नामांकीत दुध पावडर ची तस्करी याच भेसळयुक्त दुग्धजन पदार्थ माफीया यांच्याकडून केले जाते
हा भेसळयुक्त खवा चक्का पनिर उत्पादक हे पाहटे 3.00 वाजता काही मोजकेच कामगार घेऊन कृत्रिम दुध निर्मिती केली जाते त्यानंतर ते दुध जाळवू लाकुड वापरून ते अनाधिकृत बॉयलर वर गरम करून खवा तयार केला जातो व सकाळी सातच्या आत खाजगी वहानातून खाजगी ड्राव्हल बस व महाराष्ट्र शासनाची एस टी बस या द्वारे लेबल नसलेल्या प्लस्टिक बॅग्ग मधुन पॅकेज करून वाहतूक केली जाते
भेसळयुक्त दुग्धजन पदार्थामुळे मानवी शरीरावर हृदय किडनी व यकृत निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे दुधातील भेसळी मुळे शरीर वाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन व अमोनिया आम्ल शरीरात उपलब्ध होत नाही परिणामी लहान मुलांच्या शरीर वाढीवर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार जडत आहेत कॅन्सर रुग्णांची सुद्धा वाढ होत आहे
या दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्याची करिता पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 जून 2023 रोजी मंत्रालयातील एका बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक , संबधीत जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त ,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वैधमापन शास्त्रांचे उपनिबंधक व जिल्हा दुग्धविकास अधिकारी हे सदस्य असलेली समिती गठीत केली आहे पण हे केवळ राज्य शासनाचा दिखावा आहे .
खवा चक्का व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी महाराष्ट राज्यात किती लिटर दूध व दुध पावडर वापरण्यात येते याची आकेडीवारी शासनाने जाहीर करून या व्यवसायातील माफियांना नियंत्रित करण्यासाठी शासनाने विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी कृत्रिम दुध भेसळ व भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र व प्राणीशास्त्र (हार्मोनियम ) विभागातून उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचां तसेच अन्न औषध प्रशासनातील काही अधिकारी यांची मिलीभगत आहे याची ही चौकशी झाली पाहिजे
संबधीत भेसळयुक्त दुग्धजन पदार्थ उत्पादक माफिया हे व्यवसाय करत असताना अनाधिकृत जळावू लाकुड वापरतात . दुध गरम करण्यासाठी जो बॉयलर आहे त्याची ही रितसर बाष्पके विभागाकडून परवानगी घेतलेली नाही तसेच बॉयलर मधुन निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होते या करिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कडून त्यांनी परवानगी घेतलेली नाही त्यामुळे संबंधित आस्थापना ची नोंदणी मान्यता व परवाणगी ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे
संतोष एस. आठवले
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
त्रिंबक दातार
जिल्हाध्यक्ष इचलकरंजी महानगर
जयसिंगराव कांबळे
जिल्हाध्यक्ष कोल्हापुर जिल्हा