प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील सामाजिक कार्यकर्ते दानशूर, आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते विवेक शामराव चव्हाण यांचा वाढदिवस शांतीकुंज वृद्धाश्रम येथे साजरा करण्यात आला
या वृद्धाश्रम मध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तू देऊन एक वेगळा प्रकारचा वाढदिवस कैलासवासी श्री मारुती साळुंखे वृद्ध अर्धांग वायुग्रस्त सेवा मंडळ कोल्हापूर येथे वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांची होती. या वृद्धाश्रमाला एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या सानिध्यात जाऊन आपल्या समाजातील मित्रा समवेत जाऊन साजरा करण्यात आला. त्यावेळी निखिल कोले, विकी कोले, रोहित कदम, सतीश कुरणे, विपुल कुरणे, अक्षय कटकोळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बथूवेल कदम व वृद्ध महिला व पुरुष उपस्थित होते.