प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले :
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बौध्द धम्माचे जतन व प्रसार करण्यासाठीं आपल्या राज्यात 84000 स्तूप (बौ़ध्द विहार) आणी राज्यमुद्रे चे स्तंभ (अशोक स्तंभ) बांधून त्या वास्तू चे लोकार्पण सोहळा कार्तिकी अमावस्या दिवशी ठेवला होता आणी याच दिवशी दीपदान महोत्सव साजरा करण्याचे आदेश देण्यात आला. त्याच अनुषंगाने आपण आपल्या हेरले माळभाग समाजाच्या चौकामध्ये दीपदान उत्सव साजरा करण्यात आला.
लुपत झालेली बौध्द पंरपंरा आपल्याच गावातून परत एकदा सुरुवात करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे समाजातील प्रत्येक घरातील व्यक्तीने आपल्या परीने, आपल्या स्वतःच्या हाताने, दीप प्रज्वलन करून सामुदायिक पंचशील चे पठण केले
हा सोहळा रविवार दिनांक 12. 11. 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता माळभाग झेंडा चौक,हेरले संपन्न झाला त्यावेळी शुभेच्छा देऊन या दीपदान उत्सवासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.