प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड दि.४ नोव्हेंबर रोजी देहूरोड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलिक शेख यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्ते यांची भेट घेऊन देहूरोड शहर युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाज देहूरोड शहर व पंचक्रोशीतील मराठा बांधवांच्या वतीने देहूरोड येथील स्वामी विवेकानंद चौकत उड्डाणपुलाखाली आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस पक्ष देहूरोड शहर व मावळ तालुक्यातील तमाम मराठा बांधव व युवक काँग्रेस मलिक शेख आपल्या सोबत आहे, देहूरोड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने सरकारला विनंती आहे की मराठा समाजाचा सहनशीलतेचा अंत न पाहता मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, असे दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
त्यावेळी मावळ तालुका उपाध्यक्ष रईस शेख, देहूरोड शहर उपाध्यक्ष असिफ सय्यद, निलेश बोडके, विशाल दांगट,हिरामण साळुंके, लहुमामा शेलार, गफुर भाई शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सील काँग्रेस मावळ तालुका , देवा कांबळे बाळासाहेब शेलार, धनंजय मोरे, विलास हिनुकले, मिक्की कोचर, संदीप बालघरे, श्रीमंत शिवशरण, मोझेस दास, शिवाजी दाभोळे, उपस्थित होते.