प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी - शिरोळ तालुक्यातील शिरढ़ोण येथील अरविंद मारुती गुरव आणि सीमा अरविंद गुरव (रा.शिरढ़ोण ता.शिरोळ) या पती ,पत्नीसह नितीन गजानन माळी (इस्लामपूर) या तिघांना आज इचलकरंजीच्या गावभाग पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या तिघांनी ज्योती प्रविण गोंडाजे (रा.कुपवाड ता.मिरज) यांची गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून त्याची 9 लाख 20 हजारांची फसवणूक केली होती.त्यामुळे गोंडाजे यांनी इचलकरंजीच्या गावभाग पोलिसांत याबाबतची तक्रार दिली होती.त्या नुसार पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.दरम्यान गुरव पती पत्नी विरुध्द फसवणूकीचा गुन्हा इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे करीत आहेत.