प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-बनावट वटमुखत्यारपत्र तयार करून कोट्यावधीची जमीन हडप केल्या प्रकरणी कोल्हापुरातील मोठ्या व्यावसायिकांसह सहा जणां विरोधात जितेंद्र राचोजीराव जाधव (रा.मा.चिंचणी ).यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.शहरातील मोठे व्यावसायिक कांतीलाल चोरडिया ,बाबासाहेब देसाई,नितीन चौगुले ,एस.बी.पाटील आणि बाबासाहेब जाधव (सर्व रा.कोल्हापुर).यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की,जितेंद्र जाधव यांच्या आजोबाच्या नावे असलेली ऊच्चभृ वस्तीत कोट्यावधी किंमतीची 20 गुंठे जमीन असून या जमिनीची कागदपत्रे जाधव यांच्या नातेवाईकांच्याकडे आहेत.सदर जमिनी बाबत बाबासाहेब देसाई या व्यक्तीला कोणतेही वटमुखत्यार पत्र लिहून दिले नसताना त्यांनी सदरची जमीन चौगुले ,जाधव आणि चोरडिया यांना विकल्याचे समजले.या मालमत्तेचा वाद कोर्टात असतानाही दस्त नोंदणी केल्याची माहिती मिळाली.तक्रारदार जिंतेंद्र जाधव यांना माहिती अधिकारात या जमिनी बाबत माहिती मागविल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला असता त्यानी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या गुन्हयांचा तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ पुढ़ील तपास करीत आहेत.न