प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
५ नोव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून महागडी चैन आणि त्याची पर्स ज्यामध्ये दहा हजार रुपये होते.
एका नागरीकाला मारहाण करुन त्याची चैन आणि पैसे लुटणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.निहाल शेख आणि चांद शेख अशी या चाेरट्यांची नावे आहे. या दोघांकडून बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यांच्याकडून चोरी केलेली चैन, रोकड आणि तीन बाईक हस्तगत करण्यात आली आहे. हे दोघेही नशेखोर असून नशेकरीता ते चोरी करीत होते.
५ नाेव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून महागडी चैन आणि त्याची पर्स ज्यामध्ये दहा हजार रुपये होते. दोन बाईक स्वार तरुण घेऊन पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद होती. सीसीटीव्हीत दिसणारे चोरटे आणि गाडी नंबरच्या साहाय्याने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी शोध सुरु केला. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अजिंक्य मोरे तपास करीत होते. अखेर या प्रकरणात दोघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. निहाल शेख आणि चांद शेख अशी या चोरट्यांची नावे आहे.
दोघांकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागीने आणि रोकड हस्तगत केली आहे. या दोेघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केली होती. त्या बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. निहाल हा रिक्षा चालक आहे. तर चांद हा रिकामटेकडा आहे. दोघांना नशेखोरी करण्याची सवय आहे. नशा करण्यासाठी पैसे नसल्याने या दोघांनी चौरीचा मार्ग पत्करला होता.