अतिग्रे तालुका हातकणंगले येथे वंचित घटकाच्या सभा व बाल सभा मोठे उत्साहात संपन्न झाल्या

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी :  भरत शिंदे

  अतिग्रे तालुका हातकणंगले येथे वंचित घटकाच्या समस्या व संकल्पना आधारित ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2024 25 तयार करण्यासाठी अतिग्रे येथे असणारे बौद्ध समाजातील बौद्ध विहार मध्ये सभा घेण्यात आली प्रथमता सभेस सुरुवात करण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांनी पुष्पहार अर्पण करून सभेत सुरुवात केली . 

माने सरपंच यांच्या सांगणेनुसार या सभेचे अध्यक्ष माननीय माजी कृषी अधिकारी श्री चंद्रकांत सूर्यवंशी साहेब यांना यांना देण्यात आली त्यांना अनुमोदक ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री बाबासाहेब पाटील यांनी केले या सभेचे प्रस्ताविक अतिग्रे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री बाबासाहेब कापसे यांनी केले या सभेमध्ये बौद्ध समाज चर्मकार समाज मातंग समाजातील लोकांनी आपल्या असणारी समस्या अडीअडचणी माननीय सरपंच यांना सांगण्यात आले तसेच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री राजेंद्र कांबळे व श्री अनिरुद्ध कांबळे यांनी समाजामध्ये कोण कोणती कामे करण्याची आहे त्याची संपूर्ण माहिती देण्यात आली .



सभेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत सूर्यवंशी साहेब यांनी बोलताना सांगितले की ही वंचित सभा घेण्यात आली ती प्रथमताच बौद्ध समाज विहार मध्ये तिन्ही समाजातील लोकांना एकत्र करून घेण्यात आली त्याबद्दल माननीय सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व खास करून ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांचे अभिनंदन अभिनंदन केले वंचित घटकांच्या सभेचे शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिंदे यांनी मांडले तसेच जिल्हा परिषद विद्यामंदिर अतिग्रे व अंगणवाडी क्रमांक 188 या शाळेमध्ये बाल सभा घेण्यात आली. बालसभेवेळी ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे यांनी मुलांची कुपोषित बालकांचा आढावा घेतला व संकल्पना आधारित ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2024-25 च्या कामाची माहिती घेतली यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी मुलांची व लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी मुलांना विचारपूस करून त्यांची प्रश्न उत्तर चाचणी घेण्यात आली व इयत्ता पाचवी मध्ये असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जो टॉपर विद्यार्थी येईल त्याला रोख रक्कम 5000 रुपये देऊन व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक या दोघांचा सत्कार करण्यात येईल असे सरपंच यांनी या सभेवेळी जाहीर  केले . 

यावेळी उपस्थित सभेसाठी सरपंच श्री सुशांत वड्ड, उपसरपंच सौ छाया पाटील ,सदस्य श्री भगवान पाटील श्री बाबासाहेब पाटील, श्री राजेंद्र कांबळे ,श्री अनिरुद्ध कांबळे ,श्री नितीन पाटील,सदस्या सौ कल्पना पाटील ,सौ दिपाली पाटील, सौ कलावती गुरव ,श्रीमती अक्का ताई शिंदे, माझी कृषी अधिकारी श्री चंद्रकांत सूर्यवंशी बाबासाहेब शिंदे मनीष शिंदे पत्रकार भरत शिंदे उत्तम पाटील अमर पाटील विद्यामंदिर शाळेतील मुख्याध्यापक श्री सुरेश जाधव सर्व शिक्षक स्टाफ अंगणवाडी सर्व सेविका मदतनीस विद्यार्थी या सभेत उपस्थित होते शेवटी आभार विद्यामंदिर अतिग्रे शाळेचे शिक्षक श्री कोठावळे सर यांनी मांडले

    

Post a Comment

Previous Post Next Post