प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले ग्रामपंचायत अतिग्रे अंतर्गत चौदावा वित्त आयोग अंतर्गत व पंधरावा वित्त आयोग निधी अंतर्गत केलेल्या विकास कामाची पाहणी करण्यात आली अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व आलेल्या अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
प्रथमता नळ पाणीपुरवठा सोलर पॅनल उभारणी दररोज 15 केवी वीज निर्मिती म्हणजेच 60 युनिट दररोज उत्पादन त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेचा 20 एचपी मोटर पंप साठी पुरेशी वीज निर्मिती या सोलर पॅनल मुळे होते उर्वरित वीज महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनी साठी विभागणी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून ग्रामपंचायत साठी अंदाजे 12000 उत्पन्न या योजनेद्वारे कार्यालयातून मिळू शकते तसेच ग्रामपंचायत लोक नियुक्ती सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्यात प्रथमच ग्रामपंचायत च्या वैयक्तिक रकमेतून जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर अतिग्रे येथे शाळेसाठी इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आधुनिक तंत्रज्ञान त्यामुळे प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षण देण्याचे काम माननीय सरपंच यांनी केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याची पाहणी करण्यात आली व त्याची संपूर्ण माहिती सर्व अधिकारी वर्गाने घेतली त्यांचे स्वागत हातकणंगले तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष व रुकडी केंद्राचे प्रमुख माननीय शशिकांत पाटील सर व विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जाधव सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच शाळेतील मुलांना शुद्ध आरोग्यदायी व शुद्ध वॉटर पुरिफायर सिस्टीम ही बसवण्यात आली आहे व अंगणवाडीसाठी सोलर पॅनल बसवण्यात आले .
या सर्व कामाची पाहणी करता जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील साहेब यांनी सर्व कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की अतिग्रे गावचे सरपंच माननीय सुशांत वड्ड हे एक युवा नेतृत्व करणारे धडाडीचे आहेत तसेच अतिग्रे गावासाठी नूतन ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे यांचेही काम चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे इथून पुढे अतिग्रे गावासाठी विकास कामाबाबत शासकीय जी मदत लागेल ती मी अवश्य देऊ व सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वांचे अभिनंदन केले .
यावेळी उपस्थित उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब, पंचायत समिती हातकणंगले गटविकास अधिकारी माननीय शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी माननीय संतोष पवार साहेब ,विस्तार अधिकारी माननीय रामांना साहेब, गट शिक्षणाधिकारी माननीय जे टी पाटील साहेब ,तसेच अतिग्रे उपसरपंच सौ छाया पाटील ,सदस्य श्री भगवान पाटील, बाबासाहेब पाटील ,अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे ,नितीन पाटील,सदस्या सौ कलावती, गुरव सौ कल्पना पाटील, सौ दिपाली पाटील ,श्रीमती आकाताई शिंदे ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,सचिन पाटील सर ,पत्रकार भरत शिंदे ,उत्तम पाटील ,अमर पाटील ,सामाजिक कार्यकर्ते संजय चौगुले ,विश्वास पाटील ,राजवर्धन पाटील ,उदय पाटील, बाबजी वड्ड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अतिग्रे डॉक्टर ,आरोग्य सेवक, व सर्व स्टाफ ,जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक स्टाफ, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ,व गावातील नागरिक उपस्थित होते
शेवटी कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत विद्यमान सदस्य भगवान पाटील यांनी मांडले