प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- हालोंडी येथील भरत बाळासो परीट (हालोंडी).हा तरुण कारने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला .हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास एका कापड दुकाणा समोर झाला. भरत आपल्या दुचाकी वरुन कामाला जात असताना कोल्हापूरहुन सांगलीकडे जाणारया कारने भरधाव वेगात येऊन दुचाकी स्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली असता दुचाकी स्वार भरत याच्या डोक्याला गंभीर जखमी होऊन त्यातच तो जागीच ठार झाला .
या अपघाताची माहिती हालोंडी गावात समजताच तेथील लोकांनी गर्दी केली होती.या मुळे या मार्गावर वहातुकी कोंडी झाली होती.भरत हा मौजे वडगाव येथे एका कंपनीत कामाला होता.हा अपघात कोल्हापुर-सांगली मार्गावर हालोंडी गावच्या हद्दीत झाला .सुदैवाने कार मधिल चालकासह सर्व जण वाचले .या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली आहे.