पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस उलटुन भीषण अपघात

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप संभापूर येथे एस.टी.बस उलटली या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.हा अपघात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास झाला असून एसटी बस वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस एका बाजुला जाऊन उलटली .यातील प्रवासी झोपेत होते.त्यातील पंधरा प्रवासी जखमी झाले.सदर एसटी बस मुंबईहून चंदगडकडे चालली होती.

या अपघाताची माहिती समजताच शिरोली एमआयडीसी येथील पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी जाऊन जखमींना 108 या रुंग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील दोघांची प्रकृती गंभीर असून 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.या  अपघातात एसटी बसचेही नुकसान झाले आहे.यात जखमी झालेल्यात चालक मुंकुंद कुंभार यांच्यासह प्रवासी संजय सहादु पाटील (वय 33 ठाणे),कल्पना जोतिबा पाटील (वय 54 मुंबई),विद्याधर शंकर दळवी (वय 63मुंबई)रसिका सचिन डावरे (वय 32गोकुळशिरगाव)बंळवंत सुतार(वय 69 गडहिग्लज) लक्ष्मी थेऊरवाडे (64 ठाणे)अनिता अंनंत म्हापणकर(56चंदगड) सुरेखा प्रधान(37चंदगड)श्रीकांत रेडेकर आणि अंजली रेडेकर (रा.दोघेही कल्याण) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.या सर्वावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post