खाजगी आराम बस नदी पात्रात कोसळली .सुदैवाने सर्वजण बचावले.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे असलेल्या वारणा नदीच्या पुलावरून खाजगी बस नदि पात्रात कोसळली.यात सर्व प्रवासी सुदैवाने बचावले.ही खाजगी बस गोवाहुन मुंबईकडे प्रवासी घेऊन जात असताना शिराळा येथे येताच चालकाला अंदाज न आल्याने पुलावर असलेल्या वळणाऐवजी थेट नदी पात्रात बस कोसळली.

पण चालकाने वहातुकीवर नियंत्रण मिळविल्याने कोणतीही दुर्घटना घडली नसून सर्व प्रवासी बचावले आहेत.ही खाजगी बस गोवाहुन  मुंबईकडे जात असताना हा अपघात घडला .या अपघाताची माहिती मिळाताच ग्रामस्थासह पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मदत कार्य सुरु करून असलेल्या प्रवाशांना दुसरया गाडीची सोय करून मुंबईकडे रवाना करण्यात आले.सदर बस वरील चालकाचा ताबा सुटला असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post