आम आदमी पार्टी तर्फे मनपाच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन

खराडी येथील आपले घर परिसरात गेले १५ वर्ष झाले पावसाळी पाईप लाईन टाकली नाही! पावसाळ्यात गटाराचे पाणी गेली १५ वर्षे अनेक घरांमध्ये शिरते. याप्रकरणी पुणे मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष !! 


प्रेस मीडिया लाईव्ह :

_"पुणे मनपाचे अधिकारी हे टोलवाटोलवी करत असून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पण आम आदमी पार्टी ही आपले घर परिसरातील नागरिकांच्या सोबत असून न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही" : आप नेते व उपोषण कर्ते संजय कोने_

 'आपले घर' परिसर, खराडी मध्ये गेले १५ वर्ष झाले पावसाळी पाईप लाईन टाकली नाही. त्यामुळे तेथील लेन नं. ६ मध्ये अंदाजे ८० घरांमध्ये दर पावसाळ्यात पाणी जाऊन त्यांचे जनजीवन विस्कळीत होते. या ठिकाणी पावसाळ्यात लोक जीव धोक्यात घालून राहत आहेत. त्याबाबत आम आदमी पार्टी तर्फे गेल्या १ वर्ष पासून पुणे मनपाशी पत्र व्यवहार करून कुठलीही दखल अजूनही घेतलेली नाही अशी माहिती *आपले घर रहिवाशी व आंदोलनकर्त्या सुनिता शेरखाने यांनी दिली. 


दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ रोजी आप तर्फे "भीक मांगो आंदोलन" केले होते.  त्या वेळेस श्री बनकर सर (सहायक आयुक्त- नगर रोड क्षेत्रीय कार्यालय) यांनी ३ महिन्याचा कालावधी मागितला होता. मात्र अद्यापही या कामाची पूर्तता न झाल्याने आम आदमी पक्षातर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पासून नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात आम आदमी पार्टीचे संजय कोने व इतर कार्यकर्ते उपोषण आंदोलनास बसले आहेत, अशी माहिती आप पुणे शहर सहसंघटन मंत्री तानाजी शेरखाने यांनी दिली. 

आज आंदोलनस्थळी आप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, आप महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा गुट्टे, आप महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत, डॉ अभिजित मोरे, सुनिता काळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले आणि मार्गदर्शन केले. 

तानाजी शेरखाने 

सहसंघटन मंत्री, 

आम आदमी पार्टी, पुणे शहर 

87960 03575

Post a Comment

Previous Post Next Post