प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले /संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील वार्ड क्रमांक सहा मधील उलसार,कदम, कोले, कटकोळे गल्लीतील अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्ती विकास अंतर्गत सन 2022 23 मध्ये प्राप्त झालेल्या अनुसूचित जाती व उपायोजने अंतर्गत निधीतून व लोकसभा हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून दलित वस्ती हेरले येथे नऊ लाख फंड मंजूर झाला,
असून वार्ड क्रमांक सहा मध्ये काँक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ कामधेनु संस्थेचे चेअरमन, व छत्रपती शाहू स्वाभिमानी गाव विकास आघाडीचे नेते आदगोंडा पाटील, चंद्रप्रभा सोसायटीचे चेअरमन व माजी सरपंच बालेचांद जमादार, व लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी क्र.6 चे सदस्य अमित पाटील ,निलोफर खतीब, उर्मिला कुरणे, ,पंचायत समिती माजी सभापती जयश्री कुरणे, सुमन चौगुले, कृष्णात कटकोळे ,मच्छिंद्र लोकरे, भीमराव उलसार, सतीश कुरणे ,विकास कांबळे, संतोष उलसार, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अशपाक देसाई ,संताजी खाबडे, इब्राहिम खतीब, सुशांत कदम, भूपाल चौगुले ,सचिन कदम ,कॉन्ट्रॅक्टर सयाजी गायकवाड व 6 नंबर वार्डमधील नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Tags
हेरले