प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
मा लमत्तेच्या वादातून आपल्या दोन बहिणींना विष पाजून ठार मारल्याची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यात किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथे घटना घडली आहे. चांगुणा नामदेव खोत (वय 65) असे मृत आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (वय 27) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश खोत आयटीआय पदवीधर असून सध्या तो बेरोजगार आहे. दरम्यान मंगळवारी तो जेवणाची वाट बघत थांबला होता. मात्र आईला जेवण बनवण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे जयेश तिच्यावर चिडला. यातून दोघांचं भांडण झालं. यावेळी संतापलेल्या जयेशने तिच्यावर काठीने हल्ला केला. नंतर कोयत्याने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता तो तिला ओढून घराबाहेर घेऊन गेला आणि तिच्यावर पालापाचोळा आणि गवात टाकून पेटवून दिले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी. चांगुणा खोत यांना तातडीने अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान लोक जमू लागल्यामुळे जयेश जंगलात पळून गेला. पळून गेलेल्या जयेशचा पोलिसांनी जंगलात जाऊन शोध घेतला. दोन तासांनी तो पोलिसांच्या हाती लागला . यावेळी पोलिसांनाही तो जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०७, ३२३, ३२४, ५०६ आणि ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Tags
क्राईम न्यूज