प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- "सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी "च्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चैतन्य आणि आनंददायी उत्सव असलेल्या "FIT RISE -75" हा कार्यक्रम संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे .आपण आपले शरीर तंदुरुस्त राहून निरोगी रहाण्याच्या अंनुष्ंगाने कोल्हापुर जिल्हयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुंटुबिया साठी 5 कि.मी. मॅरेथॉनचे चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मॅरेथॉन साठी कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुंटुबिय सहभागी होणार आहे.सदर मॅरेथॉनचे उदघाटन केंद्रींयमंत्री मा.अमित शहा हे "सरदार वल्लभभाई पटेल अकादमी " हैद्राबाद येथे करणार असून संपूर्ण भारतातील पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुंटुबिय सहभागी होऊन एकाच वेळी धावणार आहेत.
ही मॅरेथॉन शुक्रवार ता.27/10/2023 रोजी सकाळी 9.30 वाजता.अंलकार हॉल येथुन सुरु होणार असून याचा मार्ग अंलकार हॉल ते पितळी गणपती ते धैर्यप्रसाद हॉल ते सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार ते सेवा रुग्णालय आणि परत अंलकार हॉल असा असणार आहे.
Tags
कोल्हापूर