नकाशा मध्ये जो भाग लाल दिसत आहे तिथे ओला उबर कंपन्यांना गाड्या उपलब्ध नाहीत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वरअली शेख
पुणे दी,२५.शहर आणि परिसरातील रिक्षा कॅब ओला उबेर झोमॅटो आणि मोबाईल ॲप्लिकेशन ॲप द्वारे नागरिकांना सर्विस देणाऱ्या विविध संघटनेचा आज शहरात डॉ. केशव नाना क्षीरसागर.(अध्यक्ष: इंडियन गिग वर्कर्स फ्रंट)यांच्या तर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे त्या भागात कंपन्यांनी सर्ज प्रायसिंग चालू केले आहे. कंपन्यांच्या मालकीच्या काही तुरळक गाड्या चालू आहेत. जसे की एव्हरेस्ट फ्लीट.
परंतु *बंद चा गैरफायदा घेऊन सर्ज प्रायसिंगच्या नावाखाली कंपन्या ग्राहकांना कमीत कमी दुप्पट दर आकारून नफेखोरी करून लूट करनार अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आलेली आहे आहे.
आज आपण गाडी बुक करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 1)एकतर *गाडी मिळणार नाही.
२)कंपनीच्या मालकीची गाडी मिळाल्यास सर्ज प्रायसिंगच्या नावाखाली *दुप्पट तिप्पट दर* घेऊन कंपनी लुटमार करेल.
३) राईड बुक झाल्यावर ती लांबची असल्यामुळे ड्रायव्हर *पिक करायला येणारच नाही;
फूड डिलिव्हरी बॉईज चा सुद्धा बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद.
काल संध्याकाळ पासून डिलिव्हरी बॉईज ला दुप्पट तिप्पट उत्पन्नाचे आमिष दाखवून कंपन्या बंद तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कष्टकऱ्यांच्या एकिमुळे आज सकाळपासून *विविध भागात कंपन्यांना आपल्या सेवा बंद कराव्या लागल्या.* वरील उदाहरण instamart चे. तसेच खाली सुद्धा कंपन्यांनी बॉईज ला दाखवलेल्या प्रलोभनांचे काही स्क्रीन शॉट दिले आहेत.
डॉ. केशव नाना क्षीरसागर.
(अध्यक्ष: इंडियन गिग वर्कर्स फ्रंट.) यांनी अशी माहिती पत्रकार द्वारे प्रेस मीडिया लाईव्ह च्या प्रतिनिधीला दिलेली आहे
Tags
पुणे