ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेत अधिकार्यांची मनमानी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पुणे जिल्हा; दि २३, शिरुर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू आहे परंतु निवडणूक निर्णय अधिकारी आचारसंहितेचे उल्लंघन करत असलेबाबत बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने तहसीलदार शिरूर यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू असताना विविध ग्रामपंचायत निवडणुक निर्णय अधिकारी यांना प्राप्त नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेल्या दिवशी दररोज दुपारी ३:०० वाजता सुचना फलकावर जाहीर करणे बाबत पक्षाच्या वतीने वारंवार विनंती करूनही एकाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राप्त नामनिर्देशनपत्र जाहीर केलेले नाही.
लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही (free & fair) मुक्त आणि पारदर्शीपणे पार पाडणे आवश्यक आहे. अनेक उमेदवार खोटी माहिती देऊन किंवा चुकीच्या घोषणापत्र जोडून उमेदवारी मिळावता त्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता घालून दिलेली आहे.
आचारसंहितेचे प्रकरण ५ कलम १४) प्राप्त नामनिर्देशपत्रांची सूचना प्रसिध्द करणे नामनिर्देशनपत्रे सादर करण्याच्या कालावधीत दररोज दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची सूचना दुपारी ३.०० नंतर निवडणूक कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात यावी. एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे सादर केली असल्यास त्या सर्वांची अशी सूचना प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या घोषणापत्राची प्रत देखिल सूचना फलकावर लावण्यात यावी असे आदेश आहेत तसे न करणे गंभीर अनियमितता आहे त्यामुळे तहसीलदार शिरूर यांनी छाननी करण्यापुर्वी तातडीने प्राप्त सगळे नामनिर्देशनपत्र जाहीर करावे अशी तक्रार बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी तहसीलदार शिरूर यांच्या कडे दाखल केलेली आहे.
Tags
पुणे