कोमणादेवी ऑक्सिजन पार्क मधील झाडांच्या बाजूच्या गवताची केली सफाई.




       
 यावर्षी देखील दिपावली अगोदरच झाडांच्या बाजूला वाढलेल्या भरमसाठ गवताची सफाई ग्रास कटर च्या सहाय्याने  करण्यात आली यासाठी अनेक निसर्गप्रेमींचे मोलाचं सहकार्य लाभले आहे. यात इंटरपोर्ट ग्लोबल लॉजिस्टीक्स प्रा लिमिटेड चे इम्पोर्ट मॅनेजर अमोल तेली साहेब, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकुर सर खोपटे,सदानंद पाटील साहेब सारडे, शक्ती वर्तक सारडे, सुरेश जाधव सर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेली आर्थिक मदत ही या कार्यासाठी वापरण्यात आली आहे, 


निसर्ग सवर्धन  काळाची गरज ओळखून अनेक सामाजिक संस्थां सहकार्याचा हात पुढे करत आहेत, यामध्ये प्रामुख्याने कोकण कट्टा मुंबई, अजित पितळे साहेब, चित्रकार रुपेश पाटील सर- सारडे,साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सदाबहार दोस्ती ग्रुप, सुयश क्लासेस आवरे, श्री नंदाई प्रतिष्ठान वशेणी, अशा सर्वांच्या सहकार्याने झाडांच्या बाजूला वाढलेल्या गवताची सफाई करण्यात आली. सोबतच  कापलेले हे गवत महिला मजूरा तर्फे एकत्र बाजूला करून झाडांना वनव्या पासुन वाचविसाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी या 12 दिवसात  २५लिटर पेट्रोल,ग्रासकटर ऑपरेटर ची मजुरी4800 कापलेलं गवत एकत्रित करण्यासाठी महिला मजुरांची मजुरी१000 असे एकंदरित १० हजार रुपये खर्च या सफाई साठी करण्यात आले. ग्रास कटर ऑपरेटर निशिकांत दादा गावंड यांनी आपल काम चोख बजावले आहे. असंख्य निसर्गप्रेमींच या कार्यात मध्ये मोलाचं सहकार्य लाभलं आहे.या सर्व निसर्ग प्रेमीच 
सारडे विकास मंच अध्यक्ष आणि कोमणादेवी ऑक्सिजन पार्क चे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत.कारण भविष्यात एक सुंदर वनराई इथे पहायला मिळेल आणि निसर्गाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निसर्ग वाचवा निसर्ग वाढवा

Post a Comment

Previous Post Next Post