प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खोबा रोटी, कुलथाचे शिंगोळी, खानदेशी फुणके कढी, कर्नाटकी दडपे पोहे, गव्हाच्या कोंड्याचे लक्ष्मने, फसवे वांगे, ज्वारीच्या कन्या, मोदकाची आमटी असे विस्मरणात गेलेल्या घरगुती पदार्थांच्या स्मृतीला आणि चवीला उजाळा देत पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थांप्रमाणे गोड भागात सारणयुक्त पोळी खानदेशी, मूगडाळ पोळी, राजस्थानी चुर्मा पोळी, सजूरी, सांज्याची पोळी, पातोळी, खव्याची पोळी, ओल्या नारळाची पोळी, टोमॅटोची पोळी, कोंड्याचा मांडा, पंचखाद्य पोळी असाही विभाग होता. ३०० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. परीक्षक म्हणून जयश्री कुबेर आणि अनुराधा तांबोळकर यांनी काम पाहिले. पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक - स्वाती जोशी, द्वितीय क्रमांक -मीना मांडके, तृतीय क्रमांक- सीमा भुतडा, उत्तेजनार्थ- सीमा नलावडे आणि सुवर्णा अवचट, तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक-मुक्ता भालेकर, द्वितीय क्रमांक- मनीषा भावे, तृतीय क्रमांक- अनघा जोशी, उत्तेजनार्थ -पूनम परमार आणि शीतल जैन यांना पुणे नाव्रत्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात ५ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार असे बक्षिसाचे स्वरूप होते.
प्रारंभी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, काळाच्या ओघात अनेक जुने पदार्थ विस्मृतीत जात असून सध्या जंकफूडचे जे फ्याड आले आहे त्याला पर्याय म्हणून पूर्वी घराघरात केले जाणारे हे पदार्थ केले जावेत असे त्या म्हणाल्या.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल या प्रसंगी म्हणाले की, विस्मृतीत गेलेल्या या पदार्थांची चव घेताना मला आईची आठवण झाली. पूर्वी घराघरात हे पदार्थ असायचे आता मात्र पिझ्झा बर्गरच्या जमान्यात हे जुने पदार्थ कोणाला माहितही नाहीत यासाठीच या जुन्या पदार्थांच्या पाककृतींची पुस्तिका महिला महोत्सवातर्फे प्रकाशित केली जाईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी राजेंद्र बागुल, जयवंत जगताप, दीपक निकम, हेमंत बागुल, योगिता निकम, संगीता बागुल, प्रांजली गांधी आदी उपस्थित होते.
सौ. जयश्री बागुल
अध्यक्षा, पुणे नवरात्रौ महिला महोत्सव
9881737246
Tags
पुणे