कंत्राटी नोकर भरतीचे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध - पै.अमृतमामा भोसले शहराध्यक्ष भाजपा


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी  : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस आणि शरद पवार पुरस्कृत महाविकास आघाडी सरकारने विविध विभागात कंत्राटी नोकर भरतीचा आध्यादेश काढला होता. याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करण्यात आला.

कंत्राटी नोकर भरती हे मुळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. आपण स्वतः केलेल्या  पापचा घडा दुसऱ्याच्या माथी फोडायचे आणि आपणच याचा विरोध करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस आणि शरद पवार पुरस्कृत महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंत्राटी नोकर भरती करण्याचा आध्यादेश काढला होता. या आध्यादेशमुळे अनेक होतकरू तरूण-युवक आत्महत्या सारखे विचार करत होते. 

कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करून घाणेरडे राजकारण महाविकास आघाडी करत आहे. राज्यातले अनेक तरूण बेरोजगार होतील या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा आध्यादेश मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, मा.अजित पवार यांच्या महायुती सरकाने रद्द केला. त्याबद्दल या महायुती सरकारचे आभिनंद करण्यात आले. आणि महाविकास आघाडीचा धिक्कार असो, महाविकास आघाडीच करायचं काय खाली डोक वर पाय घोषणा देऊन विरोधात जाहीर निषेध करण्यात आला. 
यावेळी विनोद कांकानी, प्रसाद खोबरे,  प्रशांत शालगर, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, अरुण कुंभार, उत्तम चव्हाण, अनिस म्हालदार, जयकुमार काडाप्पा, अॅड. भरत जोशी, बाळकृष्ण तोतला, मोहन बनसोडे, मोहन कुंभार, हेमंत वरुटे, विजयसिंह राठोड, अशोक पुरोहित, प्रदीप कांबळे, संजय नागुरे, बाबासाहेब गाडे,शंकर झित्रे, आप्पासाहेब गोकावी, मनोज जाधव, सचिन मासाळ,नामदेव सातपुते, म्हाळसाकांत कवडे, अली हुसेन खान महमद नदाफ,प्रदीप मळगे, सलिम शिकलगार आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post