प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक नामदेव माळी यांच्या ' एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य 'या बालकुमार कादंबरीवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी किशोर मासिकाचे संपादक मा.किरण केंद्रे आहेत. तर या बालकुमार कादंबरीवर प्रा. डॉ. रफिक सुरज आणि नीलम माणगावे हे मान्यवर साहित्यिक भाष्य करणार आहेत. तर कादंबरीचे लेखक नामदेव माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे चर्चासत्र समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये शनिवार ता. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे होणार आहे. तरी जिज्ञासू नागरिक बंधू भगिनींनी भगिनींनी या चर्चासत्रास चर्चासत्रास उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधन वाचनालय आणि दमसाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
इचलकरंजी