प्रेस मीडिया लाईव्ह न्युज निर्भिड पणे जनहितार्थ आवाज उचलते याचा आम्हाला अभिमान आहे : फिरोज मुल्ला सर
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी येथे प्रेस मिडिया लाईव्ह पुणेचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या मध्ये संगीत, नृत्य, गायन, वादन, कला, क्रिडा, अभिनय, सांस्कृतिक ,सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा सन्मान समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या समारंभाचे अध्यक्ष मा. प्रसाद कुलकर्णी (सरचिटणीस समाजवादी प्रबोधिनी) होते. आपले मनोगत व्यक्त करताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले की , प्रेस मीडिया लाईव्ह च्या कार्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, ते पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय एकातमिताचे काम करीत आहेत. त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या .
कार्येक्रमाच्या प्रस्ताविक फिरोज मुल्ला सर यांनी केले , ते म्हणाले की पुणे मीडिया लाईव्ह न्युजच्या राष्ट्रीय पूरस्कार सोहळ्यामध्ये पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) पुरस्कार्थी व जनतेला संबोधित करताना म्हणाले देशातील जनतेला न्याय हक्क देण्यासाठी चौथे खांब म्हणजे पत्रकारिता संविधानीक पध्दतीने निर्भिडपणे लिखाण करून जनतेचे प्रश्न सोडवता येतात परंतु अशी प्रामाणिक पत्रकारिता फार कमी दिसते पण प्रेस मीडिया लाईव्ह न्युज निर्भिड पणे जनहितार्थ आवाज उचलते याचा आम्हाला अभिमान आहे ज्या पध्दतीने सर्व महापुरुषांनी राष्ट्रीय एकात्मता ठिकवण्यासाठी काम केले तसे जाती पातीच्या पलिकडे जावून भेदभाव न करता पत्रकारिता करणे काळाची गरज आहे पत्रकारिता ही संविधानीक म्हणून संविधान जिवंत ठेवने या देशातील प्रत्येक नागरिकांनासह पत्रकारचे कर्तव्य आहे ज्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यांनी सुद्धा निर्भिडपणे प्रामाणिक संविधानीक पत्रकारिता करून जनतेचा आवाज न्याय हक्कासाठी बुलंद करावा असे महत्त्वाचे मार्गदर्शन करून जनतेला संबोधित केले .
कार्येक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दगडु माने- (जेष्ठ पत्रकार व अभिनेते शिरोळ) तर प्रमुख उपस्थिती- म्हणून अॅड. विश्वास पांडुरंग चुडमुंगे माजी अध्यक्ष.अतिरिक्त जिल्हा अॅडव्होकेट बार असोसिएशन मा.श्री सत्यवान हाके साहेब (पोलीस निरीक्षक शहापूर स्टेशन) मा.श्री. राजीव पाटील सहाय्यक (पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी) ,मा. श्री. केदार कुलकर्णी (संगीतकार ); मा. युसुफ तासगावे (समाजसेवक) ; मा. पद्मजा खटावकर (अभिनेत्री); भाऊसाहेब फास्के- (जेष्ठ पत्रकार); फिरोज मुल्ला, सर; प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक- मा. मेहबूब सर्जेखान , कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके म्हणाले प्रेस मीडिया लाईव्ह हे पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा सन्मान करीत आहे हे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी पत्रकार शिवाजी येडवान,अभिनेते आसिफ संजापुरे सलीम संजापुरे, डॉ.अशोक ठोभके,पत्रकार श्रीकांत कांबळे, भरत शिंदे, रसिका फोटो स्टुडिओ या सर्वाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेल्या मान्यवरांची नांवे पुढील प्रमाणे....
१) अनिल पाटील (राधानगरी)- राष्ट्रीय "युवा समाजरत्न" पुरस्कार; २) युवा चित्रकार, नौशाद शेख (भोसरी-पुणे)- राष्ट्रीय "युवा कलारत्न" पुरस्कार; ३) किशोर पाटील (कासारपुतळे- राधानगरी)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ४) युसुफ तासगावे (इचलकरंजी)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; ५) डॉ. मुनकिर मुजावर (चिपरी, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ६) शितल पाटील (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ७) दैनिक महान कार्य चे पत्रकार- संभाजी चौगुले (हेरले, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ८) रमेशकुमार मिठारे (अकिवाट, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श समाजरत्न" पुरस्कार; ९) अर्जुन जाधव (मौजे सांगाव, कागल)- राष्ट्रीय "विशेष सेवारत्न" पुरस्कार; १०) टीव्ही नाईन व एस न्यूजचे पत्रकार- साईनाथ जाधव (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; ११) रोहन साजणे (हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श पत्रकार" पुरस्कार; १२) प्रसिद्ध कलाकार- प्रदीप देसाई (कोल्हापूर) राष्ट्रीय "आदर्श कलारत्न" पुरस्कार; १३) माय महाराष्ट्र न्यूजचे संपादक- विनायक कलढोणे (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट पत्रकारिता" पुरस्कार; १४) बी. न्यूजचे वरिष्ठ पत्रकार- संजय कुडाळकर (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट पत्रकारिता" पुरस्कार; १५) सौ. वैशाली कनालकर (देहूरोड, पुणे)- राष्ट्रीय "आदर्श गृहिणी" पुरस्कार;१६) छोटूसिंग रजपूत (इचलकरंजी) राष्ट्रीय "उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर" पुरस्कार ; १७) सामाजिक कार्यकर्ते- सारंग पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "युवा समाजरत्न" पुरस्कार; १८) सागर मिसाळ (निगवे दुमाला, कोल्हापूर)- राष्ट्रीय "कलारत्न" पुरस्कार; १९) सौ. मंदा देशपांडे (दत्तवाड, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श कलारत्न" पुरस्कार; २०) सहाय्यक प्राध्यापक- प्रशांत पवार (करवीर, कोल्हापूर)- राष्ट्रीय "आदर्श शिक्षक" पुरस्कार; २१) देविदास इंगळे (पिंपरी, काळेवाडी)- राष्ट्रीय "उत्कृष्ट गझलकार" पुरस्कार; २२) पत्रकार- राजेंद्र पुजारी (रांगोळी, हातकणंगले)- राष्ट्रीय "दर्पण" पुरस्कार; २३) कवी- विलास पाटील (इंगळी, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श साहित्यरत्न" पुरस्कार; २४) सिद्धाप्पा गावडे (कारदगा, निपाणी)- राष्ट्रीय "आध्यात्मिक गुरुगौरव" पुरस्कार; २५) सौ. बिस्मिल्ला व श्री. अल्लाबक्ष मुल्ला (जयसिंगपूर, शिरोळ)- राष्ट्रीय "आदर्श माता- पिता" पुरस्कार; २६) दिपक पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; २७) सागर पाटील (अतिग्रे, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श सरपंच" पुरस्कार; २८) हाजी, रेहमान खलिफा (इचलकरंजी)- राष्ट्रीय "समाजरत्न" पुरस्कार; २९) सौ. मरियम पटेकरी (इचलकरंजी)- राष्ट्रीय "आदर्श माता" पुरस्कार; ३०) सौ. गायत्री पवार (तारदाळ, हातकणंगले)- राष्ट्रीय "आदर्श शिक्षका" पुरस्कार; ३१) डॉ. अविनाश बनगे (चोकाक, हातकणंगले)- राष्ट्रीय "विशेष सेवारत्न" पुरस्कार; ३२) युवा आर्किटेक्ट, इंजिनिअर- कादर पटेल (इचलकरंजी)- राष्ट्रीय "उद्योग रत्न" पुरस्कार; ३३) रेखा विठ्ठल चौगुले (इचलकरंजी) राष्ट्रीय "आदर्श शिक्षिका" पुरस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक लतिफ मी गैबान होते तर विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते युसुफ तासगावे यांनी केले.
पुण्यातील प्रसिद्ध इत्तर चे मालक अल अजीम यांनी या कार्येक्रमासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.
Tags
इचलकरंजी