विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची प्रबोधन वाचनालयास भेट





प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :  समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या विद्यानिकेतन हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीनी भेट दिली.

प्रबोधन वाचनालयाच्या वतीने सौदामिनी कुलकर्णी यांनी शिक्षकांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.तसेच विद्यार्थ्यांना  ग्रंथालयाच्या वाटचालीची व ग्रंथसंग्रह,नियतकालिके, संदर्भ विभाग, बाल विभाग यासह ग्रंथालयीन कामकाजाची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष गजाननराव सुलतानपूरे,स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रा. आर. आर.पाटील आणि मुख्याध्यापिका श्रीमती युगंधरा भेंडवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ए. टी.अडकिल्ला व श्रीमती आर.एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रबोधन वाचनालयास भेट देऊन सर्व माहिती घेतली.नंदा हालभावी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post