प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांचा मुलगा आणि इचलकरंजी शहरातील जयहिंद मंडळाचा कबड्डी खेळाडू आदित्य शंकर पोवार याची दहाव्या प्रो कबड्डी स्पर्धेसाठी बंगळुरु बुल्स संघात निवड झाली आहे.
प्रो कबड्डीसाठी निवड झालेला तो शहरातील पहिलाच खेळाडू तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्यानेमहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदित्यचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्याध्यापक शंकर पोवार,प्रा.शेखर शहा,स्वीट सहायक सदाशिव शिंदे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्रदीप झंबरी, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचेसह शहरातील कब्बडी खेळाडू उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी